महाआघाडीला धक्का, अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाही

0
15

मुंबई: राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत.

कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत असून हक्काची दोन मतं गमवावी लागण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयावर आपण उच्च न्यायलयात अपील करणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे.