• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 10 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात आता बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बीलीब अभ्यासक्रम सुरू होणार
0
SHARES
0
VIEWS


दुसऱ्यांदा संधी: विद्यार्थ्यांनी दि. 9 जुलैपर्यंत अर्ज करावे

सोलापूर, दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे पुन्हा एकदा नियोजन करण्यात आले असून दि. 10 जुलै 2024 रोजी ऑनलाइन माध्यमातून ही प्रवेशपूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली. 

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरील ऍडमिशन डेस्क या लिंकवर जाऊन विविध  अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 जुलै 2024 पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना दि. 9 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. दि. 10 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे.

पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच  विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्स  या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. 

विद्यापीठ संकुलातील एमएससी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल, एनालिटिकल, फार्मास्युटिकल, एमएससी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएससी कम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएससी स्टॅटिस्टिकस, एम.ए.मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे.  याचबरोबर एमएससी बॉटनी, झूलॉजी, एमएससी ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

विद्यापीठ अधिविभागात या अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश
एमएससी जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम.ए. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम.ए.मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू , पाली, प्राकृत आणि कन्नड, एम. ए. संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्ट्स, एम.कॉम. ऍडव्हान्स अकाउंटन्सी, ऍडव्हान्स बँकिंग, बीव्होक पत्रकरिता व जनसंज्ञापन, ऍडव्हान्स पी जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी जी डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, फाईव्ह इयर एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम. ए. योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या परिसरातील अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

ही प्रवेश पूर्व परीक्षा वेब बेस्ड ऑनलाइन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षा द्यावयाची आहे, त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी 200 रुपये अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. परराज्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा देता येणार असल्याचे प्र-कलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले.

Tags: admissioncoursesJulyPre-Entrance ExamSolapur University
Previous Post

मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

Next Post

मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …

मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …

ताज्या बातम्या

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026