महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सोलापूर गट, पुणे विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २०२६ मध्ये भावनाऋषी कामगार कल्याण केंद्राच्या दिगंबर महाराज भजनी मंडळ, सेटलमेंट, सोलापूर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मंडळाने भजन सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावला, तर ताल संचलनासाठीही प्रथम पारितोषिक मिळवले.
या मंडळाचे मुख्य गायक व हार्मोनियम वादक म्हणून चैतन्य लोंढे, तबला वादक सचिन गायकवाड, पखवाज वादक ऋषिकेश गायकवाड यांनी साथसंगत केली. तसेच अशोक गायकवाड, शांतय्या स्वामी, शुभम जांभळे, विठ्ठल गायकवाड, आनंद जांभळे, अजय गायकवाड, भूषण जाधव, साईनाथ गंभीरे आणि समर्थ पवार यांनी कोरस सादर केला.
या स्पर्धेत ऋषिकेश गायकवाड यांना उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून प्रथम पारितोषिक, तर चैतन्य लोंढे यांना उत्कृष्ट गायक म्हणून द्वितीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या यशामुळे दिगंबर महाराज भजनी मंडळाची २९ व ३० जानेवारी २०२७ रोजी श्री क्षेत्र शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली असून, मंडळाला स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.











