• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माळशिरसची दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” ठरली “सोन्याची नथ “ची मानकरी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2021
in इतर घडामोडी
0
माळशिरसची दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” ठरली “सोन्याची नथ “ची मानकरी
0
SHARES
0
VIEWS

११० प्रणितींना पैठणी आणि आकर्षक ड्रेस मटेरियल

काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा


सोलापूर : सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेल्या अनोख्या उपक्रमात माळशिरस तालुक्यातील दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे”ही विद्यार्थिनी “सोन्याची नथ” ची मानकरी ठरली. तर “प्रणिती” नाव असणाऱ्या ११० महिला,युवती मुलींनी पैठणी आणि आकर्षक ड्रेस मटेरियलची लयलूट केली . माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेल्या मोफत पेट्रोल  उपक्रमाचा तर तब्बल ७८७ सुशीलकुमारांनी लाभ घेतला होता . तर आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हॅटट्रिक करून विरोधकांना पराभवाची धूळ चारून जिंकलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आयोजित केलेल्या नवीन उपक्रमात “सोन्याची नथ “आणि पैठणी व आकर्षक ड्रेस मटेरियलची महिला,युवती व मुलींनी लयलूट करत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा केक कापून आनंदोत्सव साजरा केला.


ऑफिसर्स क्लब जवळील प्रणिती उद्यानात गुरुवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे,महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर आणि माजी शहराध्यक्षा सुमन जाधव यांच्या हस्ते पैठणी तसेच ड्रेस मटेरियलचे वाटप करण्यात आले.तर “सोन्याची नथ” ची मानकरी ठरलेल्या माळशिरस येथील “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” हिला नगरसेविका फिरदोस पटेल यांनी स्वतःच्या हाताने तिच्या नाकात सोन्याची नथ घालून,पैठणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये दिग्गज उमेदवारांना पराभूत करून विकास कामांच्या जोरावर विजयी पताका फडकवली. गोरगरीब व सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विकास कामांमुळे या मतदारसंघातील तळागाळातील व उच्चशिक्षित मतदारांनी सलग १५ वर्षे आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून दिले . त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नगरसेविका फिरदोस पटेल यासुद्धा गेली १० वर्षे प्रभागातील जनतेची सेवा करत आहेत.त्यांच्या विकास कामाचा अवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.याच कामाच्या जोरावर नगरसेविका फिरदोस यासुद्धा हॅटट्रिक करून तिसऱ्यांदा महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून जातील असा विश्वास काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी व्यक्त केला.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या कामावर निष्ठा ठेऊन नगरसेविका फिरदोस यांनी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या मनात आपले नाव कोरले असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी काढले.तर महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर आणि माजी शहराध्यक्षा सुमन जाधव यांनीसुद्धा नगरसेविका फिरदोस पटेल यांचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेचे तोंडभरून कौतुक केले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिक साधली आहे.जनतेनेसुद्धा विकासकामामुळे महिला म्हणून तीनवेळा आमदार प्रणितीताई शिंदे यांचा सन्मान केला आहे.त्याची उतराई करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर मध्य,शहर उत्तर व दक्षिण सोलापुर यासह ग्रामीण भागातील प्रणिती नाव असणाऱ्या महिला,युवती व मुलींनी नोंदवलेला सहभाग वाखाणन्याजोगा आहे.प्रणितीताई यांच्यासाठी सर्वतोपरी करण्याची आपली तयारी असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपला झालेला सन्मान आपण कधीच विसरणार नाही.त्यांच्या नावाने नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिलेली सोन्याची नथ कायम आठवणीत राहील अशी प्रतिक्रिया माळशिरस येथील “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” नाव असणाऱ्या विद्यार्थिनीने दिली.
यावेळी नगरसेविका परवीन इनामदार,सोहेल शेख,शौकत पठाण,सोहेल पठाण,आशा सदाफुले,मनीषा उडानशिव,मुमताज गौर,स्वाती आवारे,रजिया जमादार,नाझेरा पठाण उपस्थित होते. ऐश्वर्या हिबारे हिने सूत्रसंचालन केले.

Previous Post

राघवेंद्र स्वामी महाराज मठ परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण

Next Post

सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्वात विलीन, अमर रहे च्या नाऱ्यानं देश दुमदुमला

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्वात विलीन, अमर रहे च्या नाऱ्यानं देश दुमदुमला

सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्वात विलीन, अमर रहे च्या नाऱ्यानं देश दुमदुमला

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026