सोलापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 06 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय (सेतू हॉल) सोलापूर येथे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी कळविले आहे.
सदर दिवशी जनतेच्या तक्रारीबाबत संबधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी उपस्थित रहावे. तसेच मागील महिन्यातील प्रलंबित अर्ज, निवेदने, आपले सरकारवरील प्रलंबित तक्रारीवर केले कार्यवाही आदी माहितीसह संबधितांनी वेळेत उपस्थित रहावे , असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी कळविले आहे.