सुट्टीच्या दिवशी सिईओ आव्हाळे यांनी केली कार्यालय व परिसराची पाहणी

0
25

कचरा विलगीकरणातून सेंद्रीय खत तयार करणेचे सुचना

सोलापूर- रविवार सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची व परिसराची पाहणी केली.
पार्किंग परिसरात साचलेला कचरा वेळेत उचलणे बाबत व कचरा चे व्यवस्थापन करणेचे सुचना कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना दिल्या.
सिईओ मनिषा आव्हाळे यांनी स्वतः पार्किंग परिसरात चालत जाऊन कचरा डेपो ची पाहणी केली. ओला व सुका कचरा वेगळा करणेच्या
सुचना दिल्या. झाडांपासून पडणारा पाला पाचोळा पासून सेंद्रीय खत तयार करून आवारातील झाडे व कुड्यांतील रोपांना घालण्या बाबत सुचना दिल्या. प्रत्येक कार्यालयात होणार कचरा वर्गीकरण करणेचे सुचना दिल्या. कचरा जास्त होणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाने घेतली पाहिजे अशा सुचना दिल्या.


ग्रामीण पाणी पुरवठा विभागास भेट देऊन कार्यालयातील स्वच्छता, निटनेटकेपणा तसेच अभिलेख वर्गीकरण करणे बाबत सुचना दिल्या. या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण व आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व तेथील परिसराची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वानी कार्यालयीन वेळेत व वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, आपले दप्तर कपाटामध्ये सहा संच पद्धतीने ठेवणेत यावेत. कार्यालयात ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल तिथे स्वच्छता करुन घ्यावी. कार्यविवरण नोंदवही अदयावत करावी, दत्पर वर्गीकरण करुन दत्पर अभिलेख कक्षाकडे पाठवावे, आपापल्या विभागाच्या अभिलेख कक्षाची स्वच्छता करुन घ्यावी. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.

लोकमान्य टिळक यांना अभिवादन
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे हस्ते लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेचे पूजन करणेत आले.