द प्लाटिनो निमाकॉम 2023 कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन

0
54

निमा सोलापूर कडून मेडिकल क्षेत्रातील भव्य अशी कायदेविषयक विभागीय कॉन्फरन्स

सोलापूर वृत्तसेवा:- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा ) सोलापूर शाखेकडून इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर याचेकरिता “द प्लाटिनो निमाकॉम 2023” हि डिव्हिजनल कॉन्फरन्स रविवार 23 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे यशस्वीरीत्या पार पडली. या कॉन्फरन्समध्ये सोलापूर शहर जिल्ह्यासह उस्मानाबाद पुणे सांगली सातारा आधी विभागातून बाराशे हुन अधिक डॉक्टरांनी उपस्थिती दाखवून कॉन्फरन्सचा लाभ घेतला.

या कॉन्फरन्सला राष्ट्रीय व राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आयुर्वेद देवता धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कॉन्फरन्स चे चेअरमन डॉक्टर नितीन बलदवा यांनी प्रास्ताविकातून कॉन्फरन्स चे महत्व विशद करीत वैद्यकीय क्षेत्रात बदलत जाणाऱ्या कायद्याची माहिती इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना जाणून घेणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यानंतर निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व सोलापूर शाखेचे मार्गदर्शक डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी सोलापूर निमा शाखेचे कार्य व संघटनेचे महत्त्व विशद केले.

सदर कॉन्फरन्स उद्घाटनाच्या दरम्यान निमा सोलापूर शाखेकडून वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नामवंत डॉक्टरांना विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडिकल क्षेत्रातील सर्व कायदेविषयक माहिती असणारी संग्रहिका *”इमेज”* या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये कायदेविषयक ज्ञानाची गरज असल्याचे सांगून अशा प्रकारची भव्य कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल निमा सोलापूर शाखेचे कौतुक करीत देशभरातील निमा शाखे समोर एक आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन केले.

दिवसभर डॉक्टरांसाठी कायदे क्षेत्रातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन झाले यामध्ये त्यामध्ये डॉ.ज्योती भाकरे, डॉ. राजेंद्र खटावकर, डॉ.निशिगंध जाधव, डॉ. मुजाद्दीन पठाण, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. धनंजय कुलकर्णी ,डॉ. नितीन कोठाळे, डॉ. असिफ शेख व प्रसिद्ध मेडिको लिगल कन्सल्टंट डॉक्टर अरुण मिश्रा, सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी मेडिको लीगल विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सोलापूर निमा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन डॉ. नितीन बलदवा, सचिव डॉ.अमोल माळगे खजिनदार डॉ. सचिन पुराणिक प्रोजेक्ट हेड डॉ. धनंजय कुलकर्णी निमा सोलापूरचे पीएसटी पदाधिकारी, वुमन फोरम, स्टुडन्ट फोरम, साई आयुर्वेद महाविद्यालय वैराग व शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर चे विद्यार्थी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.