अक्कल्कोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्या दरम्यान बोरगाव दे. गावात भाजप महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी भेट दिली. यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
बोरगाव दे. गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यासह बोरगावात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, पाणीपुरवठा करणे, बंदिस्त गटारे करणे, गावातील विविध रस्त्यांचे बांधकाम तसेच खडीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. तसेच काही कामे सुरू असून पुढील काळात ती पूर्णत्वाकडे नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या सर्व कामांकडे बघून आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांकडे बघून बोरगाव दे. चे ग्रामस्थ नक्कीच माझ्या पाठी उभे राहतील याचा विश्वास आहे.
यावेळी मोतीराम राठोड, सौ. विद्या श्याम स्वामी, सिद्धाराम बाके, अप्पासाहेब बिराजदार, चनप्पा कामशेट्टी, विरभद्र स्वामी, दत्ता जिरगे, अशोक जीरगे, गुंडप्पा गावडे, सिद्धाराम किवडे, मल्लिनाथ फुलारी, मौला मुजावर, प्रल्हाद पाटील, दत्ता हत्तरके शेकाप्पा कलकुटगे, प्रदीप पाटील, सुनील सावंत, प्रकाश पोमाजी यांच्यासह भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांचे सहकारी उपस्थित होते.