विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत बुधवारी प्लास्टिक बंदी साठी शपथ ..!

0
40

सोलापूर – जिल्हात ओडिएफ प्लस ला गती देणे साठी आयोजित विशेष स्वच्छ अभियान अंतर्गत २३ आॅगष्ट रोजी प्लास्टीकचा वापर कमी करणे साठी जिल्ह्सात मोहिम राबविणेत येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली जिल्ह्यात दि. २३ आॅगष्ट रोजी प्लास्टिक चा वापर कमी करणे साठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेतली आहे.

गाव पातळी वर किरकोळ विक्रेते यांना प्लास्टिक वस्तूचा संभाव्य धोका कसा आहे व त्याचा वापर घटविणे संदर्भात चर्चा करणेत येणार आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामसभा मध्ये प्लास्टिक बंदीचे ठराव घेणेत येत आहेत. या दिवशी सर्व शाळा मध्ये प्लास्टिक बंदी बाबत शपथ दिली जाणार आहे. पंचायत समिती स्तर तसेच गाव पातळी वर देखील शपथ दिली जाणार आहे. या मध्ये बचतगट व ग्रामस्थ तसेच सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी सहभागी होत आहेत.

प्लास्टिक चा वापर कमी होणे साठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दि. १५ आॅगष्ट पासून प्लास्टिक बंदी बाबत विशेष जनजागृती केली जात आहेत. दि. १५ आॅगष्ट रोजी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व जिल्हा वासियांना प्लास्टिक चा वापर कमी करणे साठी आवाहन केले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सर्व शासकीय कार्यालयात प्लास्टिक चा वापर करणेवर निर्बंध आणले आहेत. सध्या कर्मचारी व अधिकारी पिण्याच्या पाण्या साठी स्टील व काचेचे बाटलीचा वापर करीत आहेत. आधी केले मग सांगितले…. याचा प्रत्यय सध्या जिल्हा परिषदे मध्ये येत आहेत. तालुका व गाव पातळीवर देखील ही मोहिम अधिक व्यापक करणेत येत आहेत.

प्लास्टिकचा वापर टाळा – सिईओ मनिषा आव्हाळे
शासनाने प्लास्टिक वर निर्बंध आणले आहेत. प्लास्टिक चा एकल वापर कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करणे साठी सर्व जिल्हा वासियांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.