कल्याण क्रांतीत सिध्दरामेश्वरांचे मोठे योगदान : शरण बसव स्वामी

0
36

सोलापूर : १२ व्या शतकात झालेल्या कल्याण क्रांतीत सिद्धरामेश्वरांचे मोठे योगदान असून अनुभव मंटपचे ते तिसरे अध्यक्षही होते.शिवयोगी सिद्धराम यांच्यामुळे सोन्नलगी म्हणजे सोलापूर पुण्यभूमी बनली आहे. महात्मा बसवण्णा,अल्लमप्रभूदेव,चन्नबसवेश्वर यांच्या पुरोगामी विचार मांडले.त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी 68 हजार वचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. स्त्री पुरुष समानता, वर्णभेद,सामाजिक ऐक्य,कायक वे कैलास या विचारांची पेरणी बाराव्या शतकात केले असे प्रतिपादन शरण बसव स्वामीजी यांनी केले.

लिंगायत महासभा सोलापूर वतीने आज शेळगी परिसरातील मित्र नगर येथे वैष्णवी हॉल या ठिकाणी श्रावणमासानिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जीवन चरित्रावर परमपूज्य शरण बसवस्वामीजी (चरंतेश्वर मठ) बेळगी,ता.हुक्केरी,जि.बेळगावी यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सांगितले.

यावेळी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रंगसिद्ध कोरे तर प्रमुख पाहुणे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ, ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक शावरप्पा वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक सिंधुताई काडादी, बसव सेंटरचे प्रमुख शिवशंकर काडादी,शंकरलिंग मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे,जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मुलगे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय काडादी,शिवराज कोटगी,धोंडप्पा तोरणगी,बसवराज चाकाई, ,अशोक शेगावकर,शिवराय तेली,नागेंद्र कोगनूरे, विजय भावे, राहुल निलाखे,विश्वजीत हेले, राजेंद्र हौदे, लक्ष्मण चलगेरी,राजेंद्र खसगी,नागेश पडनुरे, गणेश धोकटे उपस्थित होते.