• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

MBBS च्या 5000 जागा रिक्त

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2026
in मुख्य बातमी
0
0
SHARES
0
VIEWS


महागड्या वैद्यकीय शिक्षणाचा परिणाम; MBBS प्रवेशासाठी कॉलेजांकडून 40 टक्केपर्यंत सवलतींची ऑफर!

येस न्यूज नेटवर्क: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र यंदाच्या NEET UG 2026 प्रवेश प्रक्रियेतून समोर आले आहे. देशभरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर MBBS जागा रिक्त राहिल्याने काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षण शुल्कात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे.

मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतर देशभरात ३,४२६ MBBS जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतरच्या प्रवेश फेऱ्यांमध्येही अनेक जागा रिक्त राहिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात काही खासगी मेडिकल कॉलेज आणि त्यांचे प्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.

एका कोटींचे शिक्षण ८० लाखांत!

काही खासगी आणि अभिमत विद्यापीठांशी संलग्न मेडिकल कॉलेजमध्ये शुल्काबाबत मोठ्या सवलती दिल्या जात असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. तामिळनाडूमधील एका अभिमत विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजने वार्षिक २५ लाख रुपयांचे शुल्क कमी करून १५ लाख रुपये करण्याची तयारी दर्शवली. म्हणजेच तब्बल ४० टक्के सवलत देण्यात आली. राजस्थानमधील एका खासगी मेडिकल कॉलेजनेही विद्यार्थ्याला ४.५ लाख रुपयांची सवलत दिल्याचे वृत्त आहे.

महागडे शिक्षण हेच रिक्त जागांचे प्रमुख कारण?

देशात वैद्यकीय महाविद्यालयांची आणि MBBS जागांची संख्या वाढत असताना खासगी महाविद्यालयांचे शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही अभिमत विद्यापीठांमधील संपूर्ण MBBS अभ्यासक्रमाचे शुल्क एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी NEET उत्तीर्ण होऊनही आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वैद्यकीय शिक्षणापासून दूर राहत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रातही MBBS च्या जागा रिक्त

महाराष्ट्रातील २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेच्या २७ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार ८,८१४ MBBS जागांपैकी ८,७३० जागांवर प्रवेश झाले असून ८४ जागा रिक्त होत्या.

वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च, खासगी महाविद्यालयांचे शुल्क आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता यांचा विचार करून वैद्यकीय शिक्षण अधिक परवडणारे करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Previous Post

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

Related Posts

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!
मुख्य बातमी

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

November 2, 2026
उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!
मुख्य बातमी

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

November 1, 2026
सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

October 31, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
मुख्य बातमी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

October 31, 2026
उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप
मुख्य बातमी

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MBBS च्या 5000 जागा रिक्त

November 2, 2026
पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

November 2, 2026
उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

November 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026