सिद्धेश्वरच्या चिमणी पाडकामास कोर्टाची स्थगिती नाही, गाळप बंद करण्याची मनपा देणार नोटीस

0
168

येस न्युज मराठी नेटवर्क : काल पासून सर्व सोलापूर जिल्हाभर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा को-जनरेशन चिमणी पाड कामास माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्या बाबतची अफवा सर्वत्र पसरली होती व त्यामुळे चिमणी पाडकामास पंधरा दिवस स्थगित मिळाली आहे व त्यामुळे आता चिमणी पाडकाम होईल कि नाही व सोलापूरची विमानसेवा सुरू होणार की नाही? याबाबत उलटसुलट चर्चांना सोलापुरात पेव फुटले होते परंतु हे ए.ए.सय्यद व एस.जी.दिघे या माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बेंचने काल दिलेल्या ऑर्डर मध्ये पाडकामास स्थगिती दिल्याबद्दल काहीही लिहिलेले नाही. याउलट त्यांनी सरकार पक्षाच्या वकिलांना ही चिमणी पाडकाम किती दिवसात होईल हे विचारल्यावर वकिलानी ते अंदाजे दोन आठवड्यामध्ये होईल असे उत्तर दिल्याचे नमूद आहे. त्यामुळे चिमणी पाडकाम नक्कीच होणार व त्यानंतर सोलापूरची विमानसेवा त्वरित चालू होण्याचे स्पष्ट संकेत आता स्पष्ट दिसत आहेत व त्याबाबत सोलापुरातील प्रशासनातील सर्व विभाग संयुक्तिकपणे कामाला लागलेले आहेत. सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी कालच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांना तातडीने ई-मेल पाठवून सिद्धेश्वर साखर कारखाना त्वरित बंद करावा.

तसेच महाराष्ट्र विद्युत प्राधिकरणास कारखान्याचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करावा याबाबत महावितरणचे व्यवस्थापक व अध्यक्षांना तातडीचे ईमेल पाठवलेले आहे. सोलापूर विचार मंचच्या या लढ्यात आता उस्फूर्तपणे सोलापूर व सोलापूरच्या बाजूच्या जिल्ह्यातील सर्व स्तरातील संस्थांनी पत्र लिहून पाठिंबा दिलेला आहे.विमानसेवा सुरू झाल्याने सोलापुरातील व आजूबाजूच्या सर्व लोकांचे भवितव्य उज्वल होणार आहे, तसेच सोलापूर येथील शेतकऱ्यांचा उत्पादित माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाऊ शकेल व त्यांना त्यांच्या मालाचा चांगला मोबदला मिळू शकेल. कारखाना हा तात्पुरता चिमणी पाडकाम होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शेतकरी, सभासद व कामगार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे ,सोलापुरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून पोलीस व प्रशासनास या कामात सहकार्य करावे. कारखान्याची बेकायदा चिमणी पडल्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्यास गेले आठ वर्ष लागलेले बदनामीचे बालंट कायमस्वरूपी जाईल व कारखान्याचे नवीन अध्यक्ष व संचालक मंडळ या कारखान्यास पुन्हा नक्कीच उर्जितावस्थेत नेतील. त्यामुळे सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदा को-जनरेशन चिमणी नक्कीच पडून काही दिवसात कारखान्याच्या इतर चीमण्यानवर हा कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप सुरू करेल व सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाचा मार्ग मोकळा करून देईल त्यामुळे विमानतळ व कारखाना ह्या दोघांचाही फायदा होणार आहे व यात सिद्धेश्वराच्या कृपेने लवकरच यश प्राप्त होईल.