• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ६ ते ८ डिसेंबर दरम्यान धान्य व फुड्स मशिनरीचे प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापुरात ६ ते ८ डिसेंबर दरम्यान धान्य व फुड्स मशिनरीचे प्रदर्शन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : धान्य व फुड्स मशीनचे भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन मिलेट टेक एक्सपो व ग्रेन इंडियाचे १३ वे प्रदर्शन ६ ते ८ डिसेंबर रोजी सोलापुरातील विष्णू मिल कंपाउंड ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळेत होणार असल्याचे सोलापूर डाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा आणि सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंड च्या ग्राउंड वर हे प्रदर्शन होत असून एडामास इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे जवळपास १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. डाळी, तांदूळ, गहू, मिलेट्स, मसाले, मैदा, बेसन, गहू, पोहे, शेंगदाणे, मका, काजू, ऊस अशा विविध धान्यांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी मशिनरी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. सरकी, सोयाबीन अशा विविध बियांपासून बनणारे तेल ज्या मशीन मधून तयार होते ती मशिनरी देखील या प्रदर्शनात पाहायला मिळेल. सोलापुरात डाळ मिल ओनर्स असोसिएशन गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. या प्रदर्शनात नव्याने उभारण्यात येणाऱ्या डाळ मिल साठी तसेच यंत्रसामग्री साठी सबसिडी मिळवून देणाऱ्या कंपन्यादेखील सहभागी होत आहेत.

या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या तरुणांना एकाच छताखाली सर्व यंत्रसामग्री प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. धान्य उत्पादन व गुणवत्ता वाढ तसेच उत्पादनाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे डाळी आणि विविध धान्यांवर प्रक्रिया करणारे नवीन उद्योग सुरू होण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष भुतडा यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर ( भरडधान्य ) म्हणून जाहीर केले आहे. विविध मशिनरींचे थेट प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. सोलापूर तसेच लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूर या सोलापूर जिल्ह्याच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील डाळ मिल ओनर्सना त्यांच्या कारखान्यांमध्ये अत्याधुनिकीकरण करण्यासाठी या यंत्रसामुग्रीचा उपयोग होणार आहे.

जागतिक भरडधान्याचे मार्केट २०२० मध्ये ९.९५ बिलियन डॉलर्स होते. हे मार्केट २०२८ पर्यंत १४.१४ बिलियन डॉलर्स म्हणजे ४.४१ % वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील लोकांना हेल्दी फूडकडे वळवणे, तसेच भरडधान्य हे न्यूट्रिशनसाठी सुपीरियर असल्याने त्याची उपयुक्तता पटवून देणे, इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगली असणारी भरडधान्य लोकांना खाण्यासाठी उद्युक्त करणे अशी उद्दिष्टे युनोने इंटरनॅशनल एअर ऑफ मिलेट्स२०२३ जाहीर करताना ठेवली आहेत. या कार्यक्रम चे आयोजन मध्ये ज्येष्ठ सभासद राजेंद्र तापडिया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा व सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी सांगतिले. पत्रकार परिषदेस नितीन घटोळे, राहुल सोमाणी व अक्षय जव्हेरी उपस्थित होते.

Previous Post

बार्शीत दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्यांचे वाटप

Next Post

अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026