सोलापुरातील हुतात्मा नाट्यगृहाचे भाडे 40 टक्के कमी केले नाट्यप्रेमींनी केला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा सत्कार

0
13

सोलापूर —हुतात्मा स्मृती मंदिर या नाट्यगृहाचे काही दिवसापूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भाडेवाढ केली गेली होती. ती भाडेवाढ कलाकाराच्या आग्रहास्तव महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भाडे वाढ कमी केली.त्याबद्दल आज सोलापूर शहरातील नाट्य परिषदे व अध्यक्ष नियमक मंडळ, सदस्य नियमक मंडळ, कार्यकारी सदस्य यांनी एकत्रित येऊन आयुक्त शीतल तेली-उगले व उपायुक्त विद्या पोळ यांचा सत्कार केला याप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरी शाखेचे अध्यक्ष श्री विजयकुमार साळुंखे, नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमाबडी, म्युझिकल आर्टिस्ट मुकुंद खरात,ज्येष्ठ कलावंत श्रीपाद येरमाळकर, जेष्ठ कलावंत किरण फडके, ज्येष्ठ कलावंत अशितोष नाटकर ,किरण लोंढे, ओंकार साठे, सागर देवकुळे, सोमनाथ लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.