जिल्हयात पर्यावरण पुरक गणेशोत्सव निमित्त १६ सप्टेबर रोजी स्वच्छता मोहिम – सिईओ मनिषा आव्हाळे

0
10

माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशन चा उपक्रम
सोलापूर – ​स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व माझी वसुंधरा अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवा साठी स्वच्छता श्रमदान मोहीमेचे आयोजन करणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेत आज सिईओ यांचे दालनात पत्रकारांशी वार्तालाप करताना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव संपुर्ण जिल्हात साजरा करणेत येत असल्याचे सांगितले. गणेश चतुर्थी पुर्वी स्वच्छता श्रमदान मोहिमे निमित्त विविध उपक्रम राबविणेत येत आहेत. दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता स्वच्छतेची शपथ व प्रभात फेरी काढणेत येणार आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या सहभागाने स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता श्रमदान मोहीमेची जनजागृतीसाठी प्रभात फेरी सर्व ग्रामपंचायतीमध्ये काढण्यात यावी. प्रभात फेरी द्वारे स्वच्छता श्रमदान मोहीमेमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात यावे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छता श्रमदान मोहीम घेणेत येणार आहे.
ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक जागेच्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविणेत यावे.
ग्रामपंचायतीमधील घरांच्या जवळील जागेमध्ये कचरा आढळून येत असेल तर सदर कचरा काढणे अथवा जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी सदर कुटुंबाची असणार असल्याबाबत गावातील कुटुंबाना सुचित करण्यात यावे.

ज्या मार्गाने गणेश मुर्तीचे आगमन होणार आहे. अशा सर्व मार्गावर सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे अस्तित्व असेल तर तेथे स्वच्छता श्रमदान मोहीम राबविणेत यावी. गणेशोत्सव कालावधीत व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टीक बंदी करण्यात यावी. तसेच प्रभातफेरी माध्यमातून प्लास्टीक बंदी बाबत गावात जनजागृती करावी.
तालुक्यातील निवडण्यात आलेल्या सार्वजनिक जागा त्या ठिकाणी कचरा टाकला जातो अशा ठिकाणी श्रमदान मोहीमे अंतर्गत स्वच्छता करुन घेण्यात यावी.
गावामधील श्रमदान मोहिमेसाठी सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचे गट तयार करून ग्रामपंचायती मधील विविध भागात गटाचे विभाजन करून श्रमदान मोहिम राबविण्यात यावी. एकल वापर प्लास्टिक जे ५० मायक्राॅन पेक्षा कमी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या गावांमध्ये ज्या दुकानदारांकडे उपयोगात आणल्या जात असतील तर अशा दुकानदारांना Single use plastic वापरण्यास प्रतिबंध करून दंडात्मक कारवाई करावी. त्याचा वापर कमी करणेत यावा.
दि.16 सप्टेंबर 2023 रोजीच्या श्रमदान मोहिमेचे नियोजन सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली करावयाचे आहे.
सदर श्रमदान मोहिमेसाठी ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची लोकचळवळ उभी करून व्यापक प्रसिध्दी जनजागृती करावी. ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, बचत गट, तरूण मंडळे, सामाजिक संस्था, उद्योजक, ग्रामपंचायती स्तरावरील शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचा सक्रीय सहभाग महाश्रमदान मोहिमेसाठी करून घेणेत यावा.
​महाश्रमदान मोहिम ग्रामपंचायतीमध्ये यशस्वीरित्या राबविणेत येणार आहे. गट विकास अधिकारी यांनी तालुका स्तरावर तालुक्यातील सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करणेत येत आहे. हे अधिकारी व कर्मचारी श्रमदान मोहिमेत सहभागी होणार आहेत. पर्यावरण पुरक गणेशोत्सव सर्व ग्रामपंचायती तसेच महसुली गावात देखील साजरा करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

पर्यावरण पुरक मातीची मुर्ती करा – शेळकंदे
माझी वयुंधरा अंतर्गत मातीची श्री ची मुर्ती तयार करणे साठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणेत येत असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. सर्व गावात मातीची पर्यावरण पुरक श्री ची मुर्ती तयार करावी असेही आवाहन शेळकंदे यांनी केले आहे.