सोलापूर दिनांक :-नुकत्याच जिल्हा परिषद समोरील समृद्ध हॉटेल येथे समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर सन 2023- 24 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रा. राजू प्याटी, तर सचिव पदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष(प्रशासन) रामचंद्र दत्तू,उपाध्यक्ष (उपक्रम)-राजन सावंत,कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले तर खजिनदार पदी चंद्रकांत सुरवसे यांची निवड करण्यात आली. असे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या सहविचार सभेमध्ये सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा व उपक्रम याविषयी आढावा घेण्यात आला. सन 2023- 24 च्या घेण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रम यासंबंधी धोरण निश्चित करण्यात आले. या सहविचार सभेत समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख सल्लागार मा.अजित संगवे यांची खो-खो असोसिएशनच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल,कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे यांनी गेल्या वर्षी गुंटूर( आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल ,कु.प्रणाली लेंडवे हिने खुल्या गटात नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले याबद्दल व तसेच अनम रंगरेज हिने विजयवाडा (आंध्र प्रदेश)येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या चौघांचा समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला व सन 2023 -24 मध्ये शूटिंग बॉल, अॅथलेटिक्स, खो-खो, सेपक टकरा या खेळात रफिक दिवाण, व्यंकप्पा शेंडगे, पुंडलिक कलखांबकर व रविद्र चव्हाण यांनी त्यांच्या खेळ प्रकारातील सहसचिव पदावर विशेष कार्य केल्याबद्दल चौघांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
खजिनदार चंद्रकांत सुरवसे यांनी विजापूर रोड येथे व्यावसायिक तत्त्वावर क्रीडा क्लब सुरू करण्याविषयी सूचना मांडल्या .क्रीडा समस्या विषयी निवेदन देण्यासंदर्भात चर्चा झाली. या सहविचार सभेचे प्रास्ताविक सचिव संजय सावंत यांनी केले तर मा. रामचंद्र दत्तू,मा. गणेश पवार,मा. अजित संगवे व प्रा. राजू प्याटी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे यांच्या आभारानंतर सभेची सांगता झाली.
समृद्धी स्पोर्ट्स क्लबची कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
अध्यक्ष – प्रा. राजू प्याटी,सचिव- संजय सावंत,उपाध्यक्ष( प्रशासन) – रामचंद्र दत्तू,उपाध्यक्ष (उपक्रम):- राजन सावंत,कार्यकारी अध्यक्ष – शोएब बेगमपुरे,कार्याध्यक्ष – सुरेश भोसले,खजिनदार – चंद्रकांत सुरवसे
अॅथलेटिक्स उपाध्यक्ष – अविनाश गोडसे, सहसचिव – व्यंकप्पा शेंडगे
सेपक टकरा उपाध्यक्ष – अंबादास पांढरे, सहसचिव – रविंद्र चव्हाण
डायरेक्ट व्हॉलीबॉल उपाध्यक्ष – वसंत वडगावे, सहसचिव – प्रमोद कुरकुळळी
शूटिंग बॉल उपाध्यक्ष – फैजअहमद बेगमपुरे, सहसचिव – रफिक दिवाण
खो- खो उपाध्यक्ष – तुकाराम शेंडगे, सहसचिव – पुंडलिक कलखांबकर
सहसचिव( उपक्रम) – संतोष जाधव, सहसचिव (प्रशासन):-शाहनवाज मुल्ला व राजकुमार कोळी,प्रसिद्ध प्रमुख – गणेश कुडले,सहप्रसिद्धी प्रमुख – संतोष शेळके
प्रमुख सल्लागार – .भाग्यश्री बिले,विलास लोकरे,प्रशांत बडवे,अयाज शेख,अजित संगवे,समीर इनामदार,मल्हारी बनसोडे,गणेश पवार,सत्येन जाधव व विष्णू गोडगे
प्रमुख समन्वयक – नागनाथ सुरवसे, सुरेश पवार, विनोद भोसले, येताळा भगत,बाबासाहेब कापसे,संजय बनसोडे,,संजय अंबोले,विठ्ठल अभंगराव
कायम निमंत्रित सदस्य – चंद्रकांत होळकर,रमेश बसाटे,संतोष खेंडे,शिवाजी वसपटे,बसवराज मठपती,अनिल जगताप,नितीन ठाकरे,राजकुमार माने
सदस्य – जीवन इंगळे, बसवराज धायगांडे, तुळशीराम शेतसंधी, सलीम करनकोट, चेतन हनगुंडी, भिमराव राठोड, दीपक काळे,संदीप गुंड,राहुल हजारे,संतोष पाटील,मनोहर बेडगणुर,संतोष पुजारी,अरुण जाधव, दत्ता वानकर,वसंत कांबळे,विठ्ठल बिले,भास्कर गायकवाड,उमेश ओंटे,विठ्ठल शिंदे,सारंग पाटील,रफिक गारे,फरहान लालकोट,शंकर नळे,गौरीशंकर कोनापुरे,सचिन घोडके, श्रीमंत कोळी,जनार्दन वाघमारे,संतोष दळवी
महिला प्रतिनिधी – रेणुका बुधाराम, अनुराधा थोरात, अमोलिका जाधव, शुभांगी पवार,विद्या वरडूळे,भाग्यश्री अस्मिता निंबर्गी, आल्फिया शेख,मोनिका हिरापुरे