• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2026
in इतर घडामोडी
0
प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद
0
SHARES
3
VIEWS

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारण : कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

सोलापूर – शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी आता थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत संवाद सुरू केला आहे. या अभियानाचे उद् घाटन मंगळवारी पद्म नगर येथील आरकल गार्डन मध्ये झाले. अभियानाच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधील समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक शेखर इगे, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेवक सतीश सिरसिल्ला,नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने,बजरंग कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, शिवराज गायकवाड,महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक दोन चे अधिकारी रऊफ सरकाझी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक तीन चे हनीफ बक्षी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक आठ चे गायधनकर साहेब, तसेच झोनचे इंजिनिअर, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभागाचे नगरसेवक, मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रभागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या.यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक जनतेपर्यंत जाऊन पक्षाचे काम करत असतात त्यामुळे त्यांना विकासकामांबाबत काय अडचणी आहेत याची सखोल माहिती असते तसेच कोणती विकासकामे प्राधान्याने करावीत याचीही जाण या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने करण्यासाठी,नगरसेवकांप्रमाणेच अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सन्मान प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेली विकासकामे करावीत आणि कार्यकर्त्यांनीही महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान ठेवून काम करून घ्यावे. शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका. शहराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तितका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासनाकडून आपण आणू, असा विश्वास यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, जनतेचे तळागाळातील प्रश्न या अभियानामुळे कळाले. शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची तळमळ यातून दिसून येते. आगामी काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज पुरवठा, उद्यान, स्वच्छता याबाबतच्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

निवडणूक नसतानाही घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक

आगामी चार वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका आल्यानंतर जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद होण्याच्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र पुढील चार वर्षे कोणत्याही निवडणुका नसतानाही प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले. अनेक समस्यांबाबत जागेवरच महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देत संबंधित समस्या सोडविल्यामुळे नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.

मतदान न झालेल्या भागातही विकास करू

प्रभाग चलो अभियानातील चर्चेप्रसंगी एका कार्यकर्त्याने मतदारसंघातील एका परिसरात ४०० मतदान आहे त्यामुळे येथे विकासकामे व्हावीत अशी सूचना मांडली. त्यावर आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मतदानाचा विचार करू नका. ज्या परिसरातून मतदान झाले आहे त्या ठिकाणी विकास होणारच आहे. परंतु एक मतदान झाले असेल तरी तिथे विकासकामे करू. इतकेच नव्हे तर ज्या परिसरातून विरोधात मतदान झाले आहे तेथे देखील विकासकामे थांबणार नाहीत.

Previous Post

सोलापूर जिल्ह्याचा 1144 कोटींचा आराखडा डीपीडीसी मध्ये मंजूर

Next Post

अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ च्या अधिकृत लोगोचे दिमाखात अनावरण

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ च्या अधिकृत लोगोचे दिमाखात अनावरण

अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ च्या अधिकृत लोगोचे दिमाखात अनावरण

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026