• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद : मागणीचे निवेदन सादर

सोलापूर : सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे. मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले.

२०१६ साली राज्य सरकारने सोलापूर, लातूरसह अन्य सहा ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. याबाबतचा सोलापूर तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून शासनाकडे सादर झालेला प्रस्ताव प्रलंबित आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनची ३४ एकर जागा असून सुसज्ज इमारत, तज्ञ प्राध्यापक आणि पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. सोलापूर शहरात कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमागधारक कामगार, वस्त्रोद्योग कामगार व मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. त्यांचे पाल्य हुशार व मेहनती असूनसुद्धा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा खर्च श्रमिकांना तसेच मध्यमवर्गीयांना परवडणारा नाही. त्यामुळे सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक असून महाराष्ट्र शासनाने याबाबत केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत. तसेच येत्या जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळवावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आणि याबाबत सोलापुरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठीचा निर्णय आपण लवकरच घेऊ असे आश्वासित केले.

आमदार देवेंद्र कोठे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेऊन याबाबत मागणीचे निवेदन दिले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन. तसेच याबाबत तांत्रिक निर्णय घेणाऱ्या दिल्लीस्थित एआयसीटीई कडेही महाराष्ट्र शासनाकडून मी स्वतः दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा करेन, असे आश्वासनही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अनुकूल असल्याने लवकरच याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होऊन पुढील सकारात्मक कार्यवाही होईल असा विश्वास आहे. सोलापुरातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी मी कटिबद्ध आहे.

Previous Post

तर धनंजय मुंडे ला महाराष्ट्रात फिरू देणार नाही – माऊली पवार

Next Post

सोलापुर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न! विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी 63 विणकरांचा सहभाग

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सोलापुर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न! विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी 63 विणकरांचा सहभाग

सोलापुर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न! विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी 63 विणकरांचा सहभाग

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026