• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2025
in इतर घडामोडी
0
आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा
0
SHARES
1
VIEWS

आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उद्योग सचिवांसमवेत बैठक : अंतर्गत रस्त्यांसह विविध प्रश्न लागणार मार्गी

अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही एमआयडीसीतील विकासकामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर होते.

अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अक्कलकोट रस्ता एमआयडीसी १९९२ साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर एमआयडीसीमधील विकासकामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे. त्यामुळे या दोन्ही एमआयडीसीमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता एमआयडीसीतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली.

एमआयडीसी सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यामुळे शासनाचा निधी मिळण्याबाबत अधिकाऱ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात होती. तांत्रिकदृष्ट्या निधी मिळणे दुरापास्त असल्याचे सांगण्यात आले. हवे तर महानगर पालिकेकडून हा भाग हस्तांतरित करून घ्यावा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही चर्चा झाली. मात्र, दुहेरी कर आकारला जाणे जाचक ठरेल म्हणून हाही प्रस्ताव बाजूला पडला. बैठकीचा नकारात्मक सूर पाहून सोलापूरहून आलेले उद्योजक देखील हताश झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र आग्रहाने भूमिका लावून धरली. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उद्योजकांच्या व्यथा आपण त्यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी पत्रावर उद्योगविभागाच्या प्रधान सचिवांच्या नावाने सकारात्मक शेरा मारून विशेष बाब म्हणून यातून सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचना उद्योग सचिवांना दिल्या आहेत. शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत देखील सकारात्मक असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. या समस्यांबाबत विविध वर्तमानपत्रातील कात्रणेही आमदार देवेंद्र कोठे यांनी बैठकीत दाखवली. यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यआणि देखील या औद्योगिक वसाहती मधील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या पत्रावर मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी मारलेले शेरे दाखवल्याने अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवरून तशा सूचना आल्यास बघू अशी भूमिका घेतली. आमदार देवेंद्र कोठे यांनी तत्काळ उपस्थित अधिकारी व उद्योजकांना सोबत घेऊन उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन यांचे दालन गाठले. त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणि एमआयडीसीतील मूलभूत सुविधांची गरज ओळखून उद्योग सचिवांनी सर्वांसमक्ष उद्योग विभागाच्या उपसचिवांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला. सगळी माहिती घेऊन तातडीने बैठक घेऊन विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. सोलापुरातील दोन्ही एमआयडीसीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावू, असे आश्वासन देत त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्रावर तसा सकारात्मक शेराही मारला.

याप्रसंगी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते.

Previous Post

६ हजार रुपयांची लाच घेताना भुमी लेख कार्यालयातील शिपाई अडकला जाळ्यात

Next Post

सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते — सुधीर खराडकर

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते — सुधीर खराडकर

सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते -- सुधीर खराडकर

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026