• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्र न्यायालयाकडून 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम, अटकेची टांगती तलवार ?

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2025
in मुख्य बातमी
0
मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्र न्यायालयाकडून 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम, अटकेची टांगती तलवार ?
0
SHARES
3
VIEWS

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्यात ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या मंत्र्यांचे मंत्रिपद जाते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंचे मंत्रिपद काढून घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रीपद तत्काळ धोक्यात आले नव्हते.

मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा समोर आला असून जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांच्यावर सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षेची पुष्टी झाल्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची शक्यता आहे. तसेच, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारणात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या शासकीय सदनिकांचा गैरवापर करून त्या बनावट दस्तावेजांच्या आधारे बळकावल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवत कोकाटे बंधूंच्या अपीलला फेटाळले आहे. या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद पुन्हा एकदा संकटात सापडले असून राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकाटे यांच्यासमोर कायदेशीर आणि राजकीय संकट

या प्रकरणात नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाने यापूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, निकालानंतर अवघ्या दोन तासांत दोघांनाही जामीन मंजूर झाल्याने माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद त्या टप्प्यावर वाचले होते. या जामीन प्रक्रियेवर त्यावेळी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तथापि, आता जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने कोकाटे यांच्यासमोर पुन्हा एकदा कायदेशीर आणि राजकीय संकट उभं ठाकलं आहे. न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, मंत्रीपदाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिक्षेत कोणतीही सवलत देण्यास नकार

या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी सविस्तर सुनावणीअंती कोकाटे बंधूंनी सादर केलेले युक्तिवाद अमान्य करत दोषसिद्धी कायम ठेवली. मुख्यमंत्री कोट्यातील सदनिकांचा गैरव्यवहार हा केवळ प्रशासकीय चूक नसून तो थेट फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेला गंभीर गुन्हा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शासकीय कोट्यातील सुमारे 10 टक्के सदनिका गैरमार्गाने लाटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षेत कोणतीही सवलत देण्यास नकार दिला. या निर्णयामुळे सत्ताधारी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नेमके प्रकरण काय?

कमी उत्पन्न गटातील नागरिकांना शासनाकडून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प दरात सदनिका दिल्या जातात. यासाठी अर्जदाराच्या नावावर अन्य कोणतीही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. मात्र, ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी 1995 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक शहरातील व्ही.यू. अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून प्रत्येकी एक अशा दोन सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. याच इमारतीतील आणखी दोन सदनिका इतरांच्या नावावर असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर कोकाटे बंधू करत असल्याचेही तपासात समोर आले.

या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केल्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1997 पासून सुरू असलेल्या या खटल्यात एकूण चार आरोपी होते. मात्र, न्यायालयाने इतर दोघांना दिलासा देत कोकाटे बंधूंनाच दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. निकालानंतर माणिकराव कोकाटे यांना लगेलच जामीन मंजूर झाला होता. आता ही शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे.

Previous Post

पालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवरच; व्हीव्हीपॅटचा वापर नाही

Next Post

डॉ. लालासाहेब तांबडे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत मानाचा “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” प्रदान

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्य बातमी

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

November 7, 2026
आप्पाजी मदने फाउंडेशनचा सामाजिक पुढाकार; सोलापुरात नीलमनगर ते कन्ना चौक मोफत बससेवा सुरू!
मुख्य बातमी

आप्पाजी मदने फाउंडेशनचा सामाजिक पुढाकार; सोलापुरात नीलमनगर ते कन्ना चौक मोफत बससेवा सुरू!

November 7, 2026
मतदारयाद्यां विषयी निवडणूक आयोगाचा निर्णय ; वगळलेल्या नावांसाठी आता पुन्हा संधी..!
मुख्य बातमी

मतदारयाद्यां विषयी निवडणूक आयोगाचा निर्णय ; वगळलेल्या नावांसाठी आता पुन्हा संधी..!

November 7, 2026
माजी आरटीओ अधिकारी मदने यांनी दिल्या दोन बसेस, बस मधून मोफत प्रवास…!
मुख्य बातमी

माजी आरटीओ अधिकारी मदने यांनी दिल्या दोन बसेस, बस मधून मोफत प्रवास…!

November 7, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर
मुख्य बातमी

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 6, 2026
Next Post
डॉ. लालासाहेब तांबडे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत मानाचा “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” प्रदान

डॉ. लालासाहेब तांबडे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत मानाचा “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” प्रदान

ताज्या बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 7, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 7, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

November 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026