महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा सोलापूर जिल्हा दौरा

0
35

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.गोविंद काळे, प्रा.संजीव सोनवणे व लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता खाजगी वाहनाने भक्त निवास पंढरपूर येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सांगोला तसेच जत तालुक्यातील (जि.सांगली) जातसमूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी . रात्री भक्त निवास, पंढरपूर येथे मुक्काम.
बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मंगळवेढा तालुक्यातील जातसमूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी. सायंकाळी 5.00 वाजता पुणेकडे रवाना.