• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

4 जुलै रोजी सोलापूर शहरात मराठा क्रांती मोर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 20, 2021
in मुख्य बातमी
0
4 जुलै रोजी सोलापूर शहरात मराठा क्रांती मोर्चा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर | मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असलेले मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्दबातल ठरविल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभर विविध आंदोलने सुरू झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला एसईबीसी किंवा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यामातून भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 4 जुलै रोजी सोलापूर शहरातून काढण्यात येणार आहे.

या मोर्चात सोलापूर शहर-जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील करणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, खासदार नारायण राणे, शिवेंद्र राजे भोसले आदी प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी नेते उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या :
• मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे हि प्रमुख मागणी आहे.
• कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद तात्काळ करावी.
• मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेलाला तात्काळ एक हजार कोटी रुपये देऊन त्याचे उपकेंद्र सोलापुरात सुरू करावे.
• मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून ते कोणत्याही संस्थेला न देता शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावे.
• छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती चालू करण्यात यावी.
• मराठा आरक्षणासाठी ज्या मुलांनी आत्मदहन केले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत निधी द्यावा.

मराठा क्रांती मोर्चासाठी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका दौरे काढण्यात येणार आहेत. 28 जून 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. विठ्ठल रुक्मीणीचे दर्शन धेऊन तालुका दौऱ्याची सुरूवात होणार आहे.

28 जून 2021 रोजीचा दौरा
– पंढरपूर बैठक – वेळ – स. 10 वा.
मंगळवेढा बैठक – वेळ – दु. 2 वा.
सांगोला बैठक – वेळ – संध्या. 5 वा.

29 जून 2021 रोजीचा दौरा
माळशिरस (अकलूज) – स. 10 वा.
माढा – (कुर्डूवाडी) – दु. 3 वा.
करमाळा – सं. 6 वा.

30 जून 2021 रोजीचा दौरा
बार्शी – स. 10 वा.
मोहोळ – दु. 2 वा.
सोलापूर उत्तर-दक्षिण-शहर – सं. 6 वा.

1 जुलै 2021 रोजीचा दौरा
अक्कलकोट – स. 10 वा.
अक्कलकोटनंतर दुपारी 1 वा. सोलापूर येथे पत्रकारांसोबत जेवण आणि पत्रकार परिषद होणार आहे.

2 जुलै 2021 रोजी
2 जुलै रोजी सोलापूर शहरात सकाळी 9 वा. बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

4 जुलै रोजी सोलापूर शहरात मराठा क्रांती मोर्चा

Previous Post

दोन पेक्षा अधिक अपत्यं असतील तर सरकारी योजनांचा लाभ बंद; या राज्याचा निर्णय

Next Post

काँग्रेस पक्ष ५ वर्षे ठाकरे यांच्यासोबतच : नाना पटोले

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
काँग्रेस पक्ष ५ वर्षे ठाकरे यांच्यासोबतच : नाना पटोले

काँग्रेस पक्ष ५ वर्षे ठाकरे यांच्यासोबतच : नाना पटोले

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026