• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची पंचायत”, देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2023
in मुख्य बातमी
0
मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची पंचायत”, देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला
0
SHARES
1
VIEWS

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज सामना अग्रलेखातूनही उपस्थित करण्यात आला आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीवर आणि संजय राऊतांना आलेल्या धमकीबाबत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक प्रत्युत्तर दिलं. “मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पद पाच वर्षं मी सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

“जे जे लोक चुकीचं काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. कायद्यानंच राज्य चालेल”, असंही फडणवीस म्हणाले.

“संजय राऊतांना धमकी देणाऱ्या माणसाची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्यानं अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पण ही प्राथमिक माहिती आहे. याबाबत संपूर्ण तपास केला जाईल आणि कुणीही धमकी दिली असेल तर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणीही कुणाला धमकी दिली, तरी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous Post

“थोडा धिर धरा, आम्ही लक्ष घातलं आहे, यातून नक्की मार्ग काढू ” फडणविसांचे फोनवरून आश्वासन

Next Post

मनपा मालमत्ता कर विभागाची 181 कोटीची उच्चांकी वसुली

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
मनपा मालमत्ता कर विभागाची 181 कोटीची उच्चांकी वसुली

मनपा मालमत्ता कर विभागाची 181 कोटीची उच्चांकी वसुली

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026