• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in मुख्य बातमी
0
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्री
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट आलंय. अवकाळी पाऊस पाठ सोडायचं नाव घेत नाहीय अशी स्थिती आहे. गेल्या 48 तासात राज्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय. अहमदनगर, अकोला, नाशिक, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांना पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढलंय. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. राज्यातील इतर भागातही पावासाचा फटका शेतऱ्यांना बसलाय. तर दुसरीकडे अवकाळीच्या नुकसानीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आयोध्या वारीला टार्गेट केलं. अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असल्याचं त्यांनी सांगितलं.
अवकाळीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
अयोध्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नुकसानीच्या पाहणीसाठी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बीड तालुक्यातल्या कोळवाडी येथे एक किलोमीटरचा डोंगर पार करून अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. बीड तालुक्यातील कोळवाडी पिंपळनई त्याचबरोबर लिंबागणेश या ठिकाणी जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी कृषीमत्र्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीचं आश्वासनही दिलं. यावेळी पिंपळनई गावातील काही महिलांनी तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी सत्तार यांना घेराव घातला. यावेळी सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत सत्तारांनी महिलांचे पाय धरत तात्काळ मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं.
राज्यात कुठे-कुठे अवकाळीचा फटका?
राज्यावरील अवकाळीचं संकट काही केल्या कमी होत नाही आहे. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केलीय. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Previous Post

मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

Next Post

‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क…

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क…

'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क…

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026