सोलापूर शहर जिल्ह्यात शासन निधीतून झालेल्या विविध कामांची आमदारांच्या अंदाज समितीकडून पोलखोल सुरू आहे. शहरातील होटगी रोडवर गरज नसताना 165 कोटी रुपये खर्चून सिमेंटचा रस्ता का केला जात आहे असा प्रश्न या समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. एवढेच नव्हे तर या संदर्भात महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीची चौकशी करून असे मत समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. शहरातील आदीला नदीचे रेखांकन पाटबंधारे खात्याने अद्याप न केल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना समिती सदस्यांनी चांगलेच फैलावर घेतले. अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळी या तलाव दुरुस्तीसाठी जलसंधारण विभागाकडून पहिल्यांदा 22 कोटी त्यानंतर 56 कोटी रुपयांची काम झाले मात्र हा तलाव पूर्ण वाहून गेला या संदर्भात कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. इथल्या शेतकऱ्यांनी समिती सदस्या समोरच व्यथा मांडल्या. सायंकाळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अर्जुन खोतकर यांना भेटून देखील अधिक माहिती दिली. सोलापूर शहरात सुमारे साडेतीनशे कोटी रुपये खर्चून भुयारी गटारी योजनेचे काम लक्ष्मी इंजिनिअरिंग मार्फत सुरू आहे या कंपनीचे देखील समिती समोर सुनावणी होणार आहे. आषाढी वारीचा खर्च मुळेगाव ते हैदराबाद या रोडवर होत असलेला खर्च.. जिल्हा परिषदेने केलेली दहा कोटी रुपयांची औषध खरेदी आधी अनेक विषयासंदर्भात समिती सदस्यांनी विविध विभागांना चांगलेच फैलावर घेतले. सोलापूर महापालिकेने छत्रपती संभाजी तलावातील गाळ काढण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च केले याबाबत आज समितीसमोर चर्चा होणार आहे. आज दुपारपर्यंत विविध विभागांचा आढावा घेऊन समितीचा दौरा संपणार आहे.









