• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार! निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर!!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार! निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर!!
0
SHARES
1
VIEWS

19 वा वर्धापन दिन; प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्याकडून विविध पुरस्कारांची घोषणा

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार  सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश श्री उदय उमेश लळीत यांना जाहीर झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री. लळीत हे ठरले आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री लळीत यांना विनंती केली होती, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाचा 19 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा संचालक डॉ शिवकुमार गणपूर, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.

यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार:
एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : 
प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
3)  उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ):
डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल
डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल
4) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय):
प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार:
डॉ. अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर..

Tags: Announced retired Chief JusticeLifetime Achievement AwardSolapur University
Previous Post

मोहंम्मद अयाज यांच्या अली के दुलारे हुसैन ध्वनि चित्रफीत सुशिल कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित

Next Post

ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे स्वीय सहायक सुधाकर माने देशमुख पदी नियुक्ती.‌..

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे स्वीय सहायक सुधाकर माने देशमुख पदी नियुक्ती.‌..

ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे स्वीय सहायक सुधाकर माने देशमुख पदी नियुक्ती.‌..

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026