• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2026
in मुख्य बातमी
0
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
0
SHARES
6
VIEWS

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

सोलापूर : जिल्ह्यातील गरीब व दुर्बल घटकातील एकही रुग्ण वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व धर्मादाय रुग्णालयांनी घ्यावी. तसेच प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचारांचे डिजिटल दरपत्रक लावणे बंधनकारक असून, त्याचा जिओटॅग अहवाल एका महिन्यात प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हास्तरीय धर्मादाय रुग्णालय देखरेख समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. बैठकीस धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, शहाजी पवार, डॉ. वैषंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, समिती सदस्य डॉ. संतोष आडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांचे विश्वस्त व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्रांनी गरजू रुग्णांना योजनांची माहिती देऊन त्यांना संबंधित योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात डिजिटल दरपत्रक लावल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध उपचारांचे दर स्पष्टपणे समजतील. त्यामुळे दरपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. डिजिटल दरपत्रक लावल्याचा जिओटॅग अहवाल संबंधित रुग्णालयांनी एका महिन्याच्या आत प्रशासनाकडे सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धर्मादाय रुग्णालयांकडे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी सादर केलेली कागदपत्रे वैध आहेत किंवा नाहीत, याची खातरजमा रुग्णालयांनी करावी. रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन व पडताळणीसाठी जिल्हास्तरावर लवकरच स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येणार असून, या सेलच्या माध्यमातून आवश्यक माहिती घेता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांची नियमित तपासणी करा
आरोग्य विभागाने जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची नियमित तपासणी करावी. शासकीय योजनांतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाकडून योग्य पद्धतीने उपचार मिळत आहेत का, दर्शनी भागात डिजिटल दरपत्रक लावण्यात आले आहे का, आरोग्यमित्र उपलब्ध आहे का, आरोग्यमित्राकडून रुग्णांना योजनांची योग्य माहिती दिली जाते का, तसेच रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य व सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

या बैठकीस संबंधित धर्मादाय रुग्णालयांचे विश्वस्त किंवा सक्षम प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या धर्मादाय रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात १८ धर्मादाय रुग्णालये; ३५० खाटा आरक्षित
धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात एकूण १८ धर्मादाय रुग्णालये असून, शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांसाठी ३५० खाटा आरक्षित आहेत. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार या सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गोरगरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांची योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

ज्या उद्देशाने शासनाने धर्मादाय रुग्णालयांना मान्यता दिली आहे, त्या उद्देशाची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्य आहे. तसेच ज्या कारणासाठी रुग्णालयांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या जागेचा वापर केवळ वैद्यकीय सेवा देण्यासाठीच करण्यात यावा. अन्य व्यावसायिक कारणांसाठी शासकीय जागेचा वापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयांनी मासिक अहवाल सादर करावा : आमदार कल्याणशेट्टी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी दर महिन्याला उपचार व शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. बैठकीत संबंधित रुग्णालयांचे विश्वस्त व प्रतिनिधींनी आपल्या रुग्णालयातील कामकाजाची सविस्तर माहिती द्यावी. गरीब व गरजू रुग्णांना केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे उपचारापासून वंचित ठेवू नये. अशा रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

आमदार राजेंद्र राऊत यांनीही धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना वेळेत आणि कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही अशा पद्धतीने उपचार उपलब्ध करून द्यावेत. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेला एकही रुग्ण या लाभापासून वंचित राहणार नाही, याची रुग्णालयांनी काळजी घ्यावी, असे सांगितले.

यावेळी धर्मादाय रुग्णालयाचे विश्वस्त प्रतिनिधी यांनीही शासकीय योजनेचा लाभ रुग्णांना देत असताना येणाऱ्या अडचणी विषयी बैठकीत माहिती दिली.

Previous Post

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

Next Post

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

Related Posts

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल
मुख्य बातमी

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य बातमी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप
मुख्य बातमी

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप

November 2, 2026
Next Post
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026