• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसला खिंडार; देवेंद्र कोठे यांचा मास्टरस्ट्रोक

Yes News Marathi by Yes News Marathi
November 9, 2024
in इतर घडामोडी
0
शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसला खिंडार; देवेंद्र कोठे यांचा मास्टरस्ट्रोक
0
SHARES
0
VIEWS

काँग्रेसला सुरुंग लावत मोची समाजाच्या तब्बल ५ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश : माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची यशस्वी शिष्टाई

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सुरुंग लागला आहे. शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येने आणि निर्णायक मतदान असलेल्या मोची समाजाच्या ५ नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

शहर मध्य मतदारसंघात एमआयएमचा धोका ओळखून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासारख्या कार्यतत्पर आणि सक्षम उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभारण्याच्या हेतूने मोची समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. याकामी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.

जांबमुनी मोची समाजाचे शहर व जिल्हा अध्यक्ष तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सिद्राम अट्टेलुर, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेशावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने, बाबुराव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी मोची समाजाचे अनेक नेते प्रयत्नशील होते. काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. परंतु काँग्रेसकडून शब्द पाळण्यात न आल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती कटिबद्ध आहे. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहोत. मोची समाजाने पूर्ण क्षमतेने, मोठ्या प्रमाणावर प्रचार करून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.

भाजपची वाढली ताकद

शहर मध्य मतदारसंघात मोची समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना तीन वेळा निवडून आणण्यात मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा मोची समाजातील तब्बल ५ नगरसेवक आणि पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची ताकद शहर मध्य मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Previous Post

वाचनातून माझा उजेडाचा प्रवास सुरु : गणेश कुलकर्णी

Next Post

दक्षिणचा उमेदवार संतोष पवार हे मोठ्या मताधिक्याने निवडुन येणार; प्रकाश आंबेडकर

Related Posts

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
Next Post
दक्षिणचा उमेदवार संतोष पवार हे मोठ्या मताधिक्याने निवडुन येणार; प्रकाश आंबेडकर

दक्षिणचा उमेदवार संतोष पवार हे मोठ्या मताधिक्याने निवडुन येणार; प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026