No Result
View All Result
- पंढरपूर/करकंब : भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करकंब पोलीस ठाण्याचे उदघाटन झाले. येवेळी बोलताना त्यांनी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे..पण मलिक आता जेलमध्ये आहेत.
- बॉम्बस्फोटाशी निगडित असलेल्या आरोपींशी काही राजकीय लोकांचे संबंध निघाले. शिवाय मागील काळात मंत्री आणि काही पोलीस अधिकारीही तुरुंगात गेल्याचा उल्लेख विखे-पाटील यांनी केला. अवैधरित्या उत्खननावर ते म्हणाले की, खडी क्रशर, वाळू उपश्यावर कारवाई करण्यासाठी इतर जिल्हातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या अवैध उत्खननाला आळा बसेल.
No Result
View All Result