जिल्हा परिषदे मध्ये रक्तदान करून साजरी झाली जिजाऊ जयंती

0
111

सोलापूर – कोविड च्या दुसरे लाटेत अनेकांना रक्ताची गरज भासली. हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठा सेवा संघाच्या शाखेचे वतीने रक्तदान शिबीर घेऊन जिजाऊ जयंती साजरी केली. जिल्हा परिषदे मध्ये आज ५० जणांनी रक्तदान केले.

सोलापूर जिल्हा परिषदे मध्ये आज राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती चे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता प्रताप कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील , कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिरुद्ध पवार, किरण काळे प्रमुख उपस्थित होते.

जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा दिली- सिईओ दिलीप स्वामी

जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा दिली. जिजाऊमुळे स्वराज्य साकार होणेस मदत झाली. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचत असताना प्रत्येक प्रसंगात जिजाऊंचे कार्य दिसून येते. त्यांनी शिवरायांना दिलेली प्रेरणा महत्वाची आहे. असेही स्वामी यांनी सांगितले.

रक्तदान साठी कर्मचारी व अधिकारी यांची उत्सुकता .. !

कोरोना नियंमांचे पालन करीत आज मराठा सेवा संघ शाखेचे वतीने आज रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले होते. उपस्थित महिलांना फेटे बांधून जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊंच्या लेकींचा सन्मान केला.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी सुतार यांनी केले तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले.