• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, सुप्रिया कि सुनेत्रा कोण बाजी मारणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
May 8, 2024
in इतर घडामोडी
0
बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, सुप्रिया कि सुनेत्रा कोण बाजी मारणार?
0
SHARES
0
VIEWS

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीमध्ये एकूण 56.97 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 5 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 50 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 41.1 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत भाजपच्या निवडणुकीच्या काळातील व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आपले जास्तीत जास्त मतदार कशाप्रकारे घराबाहेर पडतील, यावर भर दिला जातो. मात्र, पुरंदर आणि खडकवासल्यात मतदार पूर्णपणे निरुत्साही असल्याचे दिसून आले.

बारामतीची भूमी ही लढाईचे केंद्र असल्याने या विधानसभा मतदारसंघात साहजिक सर्वाधिक 64.50 टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल इंदापूरमध्ये 62.50 टक्के आणि भोरमध्ये 48.34 टक्के मतदान झाले आहे. हे दोन्ही भाग मतदानाच्या दिवशी चांगलेच चर्चेत होते. मतदानाच्या आदल्या रात्री भोरच्या वेल्हे परिसरात अजितदादा गटाकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तर इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे दिवसभर इंदापूर आणि भोर हे भाग चर्चेत होते. इंदापूरमध्ये अजितदादा गटाच्या दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. याशिवाय, त्यांना भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची साथ होती. त्यामुळे इंदापुरात मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे. ही अजित पवारांच्यादृष्टीने सकारात्मक गोष्टी म्हणावी लागेल.

Previous Post

आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Next Post

लोकसभेला ४ जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु : प्रफुल्ल पटेल

Related Posts

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
Next Post
लोकसभेला ४ जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु : प्रफुल्ल पटेल

लोकसभेला ४ जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु : प्रफुल्ल पटेल

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026