• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिक्षिकेवर अन्याय ; निजामपूर हायस्कूलसमोर 5 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा…

by Yes News Marathi
December 26, 2025
in इतर घडामोडी
0
शिक्षिकेवर अन्याय ; निजामपूर हायस्कूलसमोर 5 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा…
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला तालुक्यातील निजामपूर गावातील निजामपूर हायस्कूलमधील एका शिक्षिकेचला नियमबाह्य अतिरिक्त ठरवण्यात आले आहे.मुख्याध्यापक संस्था व शालेय प्रशासनाने अन्याय केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेने 5 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या प्रश्नी शिक्षक आमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्ष घातले आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की मीनाक्षी पाटील या निजामपूर हायस्कूल येथे सहशिक्षिका म्हणून 15 जून 1999 पासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मीनाक्षी पाटील यांना मुख्याध्यापक, संस्था व शालेय प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने 31 ऑक्टोबर 2017 रोजी अतिरिक्त ठरविले होते. याविरुद्ध न्यायालयात दाद मागितले असता नियमबाह्य अतिरिक्त ठरवल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षिका मीनाक्षी पाटील यांचे मागील आठ वर्षाचे थकीत वेतन, दरसाल मिळणारी वेतनवाढ, सातवा वेतन आयोग लागू करणे, फंडाचे पाच हप्ते व सेवा पुस्तिका अद्यावत करून देण्याचा निर्णय दिला.

न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता मुख्याध्यापकांनी न्यायालयाचा आदेश झिडकारत उच्च न्यायालयाची अवहेलना केली आहे. याबाबत मीनाक्षी पाटील यांनी पत्रांनुसार वारंवार तोंडी, लेखी निवेदने अर्ज देऊनही मुख्याध्यापकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मीनाक्षी पाटील यांना मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर शिक्षिकेच्या न्यायालयीन आदेशान्वये वरील कार्यवाही तात्काळ पूर्ण न केल्यास दिनांक 5 जानेवारी 2026 पासून निजामपूर हायस्कूलसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास अथवा सदर शिक्षिकेच्या जीवितेस धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी संस्था व मुख्याध्यापकावर राहील असा इशारा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष प्रसाद मसरे, जिल्हा सरचिटणीस जुबेर मुजावर आणि शहराध्यक्ष काशिनाथ माळगोंडे यांनी दिला आहे.

Previous Post

प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार

Next Post

फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..

Next Post
फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..

फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In