सोलापूर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वर्षानुवर्ष कार्यरत असणाऱ्या सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर आणि त्यांच्या टीमने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गाडेकर च्या मर्जीतील अनेक क्लर्क पूर्ण महापालिका आस्थापना सांभाळत आहेत . मनमानी कारभार, अपात्र उमेदवारांना पात्र करणे, भरतीमध्ये घोटाळे करणे, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,लाड कमिटीमध्ये चुकीच्या पद्धतीने नियुक्त करणे असे अनेक गंभीर कारनामे या टीमकडून सुरू आहेत. तरीही महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि उपायुक्त सोनाली यादव याकडे दुर्लक्ष करतात. महापालिकेत झाडूवाला पदातून आरोग्य निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यासाठी तत्कालीन आयुक्त शिवशंकर यांनी आदेश काढले होते. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक आयुक्त पुष्पागंधा भगत यांनी 4 ऑगस्ट 2022 नुसार परिपत्रक काढून अर्ज मागवले होते. 43 अर्ज आले त्यातील 34 अर्ज पात्र ठरले तर नऊ झाडूवाले अपात्र ठरले. मात्र पुष्पगंधा भगत यांची बदली झाल्यानंतर गाडेकरांच्या गिरीश स्वामी तसेच त्यांच्या इतर बाबूंनी अपात्र उमेदवाराकडून पैसे घेऊन आरोग्य निरीक्षक पदे घेतली आहेत ही गंभीर बाब आहे. याची सर्व पुरावे येस न्यूज मराठी च्या हाती लागले आहेत आयुक्तांनी याची चौकशी करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या वर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.









