मूकबधिर विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनी बहारदार नृत्याविष्कार….

0
27

सोलापूर- भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गौरवगीताने सलामी देऊन साजरा केला .
विद्यार्थ्यांच्या गुणांचे, शिक्षकांच्या परिश्रमाचे, आणि मूकबधिर मुलांचे जीवन घडवण्यात संस्था कार्यतत्पर असल्याचे विशेष कौतुक आय. ए. एस. अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले.

राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली. तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ,जय जय महाराष्ट्र माझा ,हे राज्यगीत सादर केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष मल्लिकार्जुन अष्टगी यांच्या हस्ते माननीय दिलीप स्वामी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून याराना ग्रुप या समाजसेवी संस्थेतर्फे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.

या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, सहसचिव, डॉक्टर वैद्य, जान्हवी माखीजा, आरती गांधी, डॉ किरण सारडा, हिरालाल डागा, पवन अगरवाल, दीपक आहुजा, डॉक्टर वाले, गुरुराज यल्लटी, संजय चौगुले, विश्वनाथ गोयल, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैफन बागवान, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी, साहेबगौडा पाटील, बाबासाहेब पवार, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी मानले.