• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘भाजयुमो’तर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियानाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
‘भाजयुमो’तर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियानाचे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS

पुणे : “करिअर आणि कौटुंबिक जीवनात व्यग्र झालेल्या तरुणांचे देशाशी, समाजाशी नाते जोडण्याचे काम व्हावे. त्यांच्यात राजकीय, सामाजिक भान आणि जाणीव वाढावी, यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतीय जनता युवा मोर्चाने सुरु केलेल्या या ‘युवा वॉरिअर्स’ अभियानातून या युवा पिढीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळेल. त्यातून त्यांची जाणीव व प्रगल्भता वाढेल,” असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्समध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशीलभाऊ मेंगडे, भाजयुमो पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बापू मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, पुणे शहर प्रभारी राजेंद्र साबळे, राहुल महाडिक, गणेश भेगडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वर्पे, सचिन जायभाये, अजित कुलथे, सुशांत गाडे, निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते. ‘युवा वॉरियर्स’च्या लोगोचे, टी-शर्ट व टोपीचे अनावरण यावेळी करण्यात आले. अनोख्या पद्धतीने कमळाच्या पाकळ्यातून युवा वॉरियर्सचा लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी आदी महापुरुषांचे कर्तृत्व या युवापिढीला समजून घेण्याची गरज आहे. आज समाजात आजूबाजूला अनेक अडचणी, प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार युवांनी केला पाहिजे. १८ ते २५ या वयोगटातील तरुणाईचे सळसळते रक्त असते. त्याला योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी. स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही या तरुणाईने द्यायला हवे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याची, तसेच राष्ट्राशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत आहे.”

“राज्यभर सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असताना शिवजयंतीला परवानगी नाकारणे हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे काळजी घेऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यायला हवी होती. एका पक्षाचे अध्यक्ष गावोगाव जाऊन कार्यक्रम, मेळावे घेतात. त्यावर निर्बंध नाहीत. मात्र, शिवजयंतीला निर्बंध घातले जातात. अभिव्यक्त होणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याची भाषा निंदनीय आहे. एल्गार परिषद होते. मात्र, पोवाडे चालत नाहीत. हिंदू धर्म हा सहनशील आणि सहिष्णू असल्याने सर्वधर्मसमभावाचे धडे देण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेकजण करतात. त्यामुळे जाज्वल्य हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता आहे,” असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

विक्रांत पाटील म्हणाले, “१८ ते २५ वयोगटातील युवा हा प्रगल्भ आणि ‘टेकनोसॅव्ही’ आहे. संवेदनशील तरुणांच्या मनात अनेक विषय घोळत असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी ‘युवा वॉरीअर्स’ हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. क्रांती घडवायची असेल तर विविध क्षेत्रातील युवा महत्वाचा आहे. युवा वॉरीअर्स सातत्यपूर्ण काम करत राहील आणि प्रत्येक विभागात दैदिप्यमान कामगिरी करत उज्जल भविष्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास वाटतो.”

अनुप मोरे म्हणाले, “रामराज्य परत यायला लागले आहे. युवा वॉरीअर्स हनुमानसेनेसारखे काम करेल. राज्यभर युवा वॉरियर्सच्या शाखांचे निर्माण करणार आहोत. ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत व शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत शाखांचे निर्माण होईल. विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम करून युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

भीमराव तापकीर आणि योगेश टिळेकर यांनी मनोगते व्यक्त केले. सुशील मेंगडे यांनी प्रास्ताविक केले. राघवेंद्र उर्फ बापू मानकर व किरण दगडे यांनी आभार मानले.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिवरायांना अभिवादन

Next Post

योगसाधना मंडळातर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा… .

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
योगसाधना मंडळातर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा… .

योगसाधना मंडळातर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा… .

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026