सोलापूर; ग्रामपंचायत तिर्रे तालुका उत्तर सोलापूर
यांच्यावतीने तीन लक्झरी बसव्दारे 150 महिलांना रामलिंग, तुळजापूर, अक्कलकोट ,वडगाव, दिंडेगाव या ठिकाणी दर्शनासाठी पाठवण्यात आले होते..प्रारंभी सकाळी सहा वाजता माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते पुजा करुन या बसेस मार्गस्थ झाल्या.

आप्पाजी मंदीरात माने यांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनला घेऊन महिलांना शुभेच्छा दिल्या पावसाने ओढ दिल्याने सारे चिंतीत झाले आहेत.राहिलेल्या कालावधीत चांगला पाऊस पडावा बळीराजा सुखी समृद्ध व्हावा. अशी भावना त्यांनी व्यक्त केली तर महिलांना श्रावण महिन्यात धार्मिक योग घडवून आणल्याचे कौतुक केले.
यावेळी सरपंच नेताजी सुरवसे,भास्कर सुरवसे, बाळासाहेब सुरवसे, अजय सोनटक्के अरविंद जाधव ,गोवर्धन जगताप ,संजय राठोड , शिवाजी सुरवसे , दादासाहेब मल्लाव सुनील मल्लाव, बिभीशण मल्लाव, संजय मल्लाव राज मल्लाव, आधी ग्रामस्थ उपस्थित होते.