• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2022
in मुख्य बातमी
0
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

राज्य शासनाकडून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात साठी 474.13 कोटीची तरतूद मंजूर

सोलापूर :- राज्य शासनाने सन 2014 मध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी एक हजार 94.89 कोटीचा आराखडा मंजूर केला; त्याअंतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शंभर कामांसाठी 474 कोटी 13 लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली 51 कामे वगळता अन्य प्रस्तावित असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम, वने, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मृद व जलसंधारण व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

       नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  पालकमंत्री  भरणे पुढे म्हणाले की, पुढील महिन्यात आषाढी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने भाविक  पंढरपूर येथे येतात. तर त्या सर्व भाविकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे. या विकास कामात काही अडचणी असतील तर संबंधित विभाग प्रमुख यांनी थेट संपर्क साधावा. त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.      

     यावेळी पालकमंत्री भरणे यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार जी 100 कामे प्रस्तावित केलेली आहेत, त्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यातील पूर्ण झालेल्या 51 कामांची माहिती घेऊन प्रगतीपथावरील 10 कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती कामे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच पोलीस विभागाने आषाढी यात्रेदरम्यान लाखोच्या संख्येने येणारे भाविक यांच्यावर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंढरपूर शहरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पंढरपूर शहरात 13 ठिकाणी 1472 इतकी सुलभ शौचालये बांधून वापरण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. तर दहा ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे या सर्व कामासाठी 67 कोटी 60 कोटीचा निधी मंजूर आहे. पुरुष शौचालय 752 व स्त्री शौचालय 720 असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी देऊन प्रगतीपथावरील इतर कामे ही संबंधित यंत्रणांकडून त्वरित पूर्ण करून घेण्यात येतील व यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

    प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या नुसार 474 कोटी 13 लाखाचा निधी सन 2014 मध्ये राज्यस्तरीय शिखर समितीने मंजूर केलेला असून त्यानुसार पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कामे प्रस्तावित केलेली होती. त्यातील 51 कामे पूर्ण झाली असून या कामांमध्ये पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. तर यातील दहा कामे प्रगतीपथावर असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याप्रमाणेच आराखड्यात सुरुवातीला समाविष्ट केलेली 31 कामे नंतर  गरज नसल्याने वगळण्यात आलेली असून आठ कामे जागेची अडचण निर्माण झाल्याने प्रलंबित आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
Previous Post

व्ही आर पवार सारीज् च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न

Next Post

174 कोटींची ड्रेनेज योजना व 84 कोटीची नळ मीटर योजना रखडणार…!

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
174 कोटींची ड्रेनेज योजना व 84 कोटीची नळ मीटर योजना रखडणार…!

174 कोटींची ड्रेनेज योजना व 84 कोटीची नळ मीटर योजना रखडणार…!

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026