174 कोटींची ड्रेनेज योजना व 84 कोटीची नळ मीटर योजना रखडणार…!

0
41

सोलापूर शहरात कोट्यवधी रुपयांच्या कामाचे टेंडर दिली गेले आहेत. एकदा टक्केवारी घेतली आणि वर्क ऑर्डर दिली की संपले ,अशा पद्धतीने अधिकारी वागत असल्यामुळे अनेक मोठ्या योजना वेळेत पूर्ण होत नाहीत. कामाच्या गुणवत्तेचा तर पत्ताच नाही. अमृत योजनेतून हद्दवाढ भागामध्ये तब्बल 174 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज योजना टाकण्यात येत आहे. वास्तविक पाहता या महिन्यात हे संपूर्ण काम संपले अपेक्षित असताना अगदी 60 टक्केच काम झाले आहे त्यामुळे अनेकांना ड्रेनेज योजना झाली तरी कनेक्शन जोडता येत नाही. दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच ABD एरिया मध्ये 84 कोटी रुपये खर्च करून स्काडा प्रणालीद्वारे नळांना मीटर बसवून पाणी पुरवठा करण्याचे काम गेल्या वर्षी दिले. वर्षभरात या कामाची गती अत्यंत कमी आहे त्यामुळे आता 16000 मीटर बसवण्यात ऐवजी अवघ्या सोळाशे नळ्यांनाच मीटर बसवले जाणार आहे. यातून उरलेली 20 ते 25 कोटी रुपयांची रक्कम उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी साठी वापरली जाईल असे मत आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी योजनेला सोलापूर शहर हरताळ फासला जात आहे.