पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज पुण्यात पशुसंवर्धन आयुक्तालयात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांना सीआयडी कडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रामध्ये वाल्मीक कराड याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता त्या पत्रकारांवर चिडल्या.
आरोपपत्रात काय लिहिले तुम्ही वाचेल का? दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला तो प्रश्न विचारा, मी पुण्यात आलेली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात.? असा सवाल पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना केला. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.










