अक्कलकोट : अक्कलकोट मतदारसंघ विधानसभा प्रचार दौऱ्यात उळे येथे सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी भेट दिली. यावेळी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आपुलकीने कल्याणशेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी गावातील कामांचा उल्लेख ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळाले.
गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते करणे, बिबिशन शिंदे घर ते किरण डांगे घरापर्यंत सिमेंट रस्ता, गंगेवाडी- कासेगाव -उळे-उळेवाडी बक्षीहिप्परगे मार्गे मुळेगाव तांडा रस्ता करणे. उळे ते कासेगाव- वडजी- बोरामणी रस्ता तसेच दत्त मंदिर पोहोच रस्ता करणे. दत्त मंदिर ते रमेश मोरे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे. नारायण शिंदे घर ते डांगे घर सिमेंट रस्ता करणे ही विकासकामे झालेली आहेत.
गावात व्यायामशाळा बांधणे, प्रकाश नगर ते इंदिरानगर पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट रस्ता करणे. अंबाजी गायकवाड घर ते भुजंग पांढरे घरापर्यंत सिमेंट रस्ता. नवीन अंगणवाडी क्रमांक तीन करणे, बक्षीहिप्परगे ते गैबीपीर ते उळेगाव गाव रस्ता सुधारणा करणे. तसेच उळे ते कासेगाव रस्ता सुधारणा, जल जीवन मिशन अंतर्गत नळपुरवठा सोय करणे आदी विकासकामे निधीसह मंजूर झालेली असून लवकरच सुरू होतील.
यावेळी शहाजी पवार, अंबिकाताई कोळी, संदीप राठोड, महेश बिराजदार, नेताजी खंडागळे, मनोज गुंड, यशपाल वाडकर, गणेश कोले, दत्ता खंडागळे, मधुकर चीवरे, प्रशांत जाधव, प्रवीण चौगुले, सोमनाथ पटणे, वैभव हलसगे, नाना शिंदे, प्रवीण कासार, पप्पू जाधव, महादेव बापू कोले, मोहन कळसे, अनिता क्षीरसागर, रुक्मिणी कोले, प्रगती गुंड, तानाजी खंडागळे, नंदकुमार शिंदे, सुधाकर कासार, नागनाथ कोले, शिवलिंग क्षीरसागर, बालाजी गुंड आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.