सोलापूर, दिनांक 25(जिमाका)- राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माढा तालुक्याच्या अरण येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी संत शिरोमणी सावता महाराज मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मण तुकाराम जाधव, सचिव विजय शिंदे, विश्वस्त एस. डी. कुलकर्णी, घनश्याम पाटील, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मनीषा फुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाचे स्वतंत्र बस स्थानक अरण येथे देण्याची मागणी मंत्री महोदय यांच्याकडे केली.