सोलापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांना कै.आमदार अण्णासाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. सोलापुरातील श्री भैरवनाथ कॉलनी सभागृह गडदर्शन सोसायटी दमानी नगर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण हे होते. यावेळी व्यासपीठावर संभाजी आरमारचे श्रीकांत बापू डांगे, पाणीवेस तालीमचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक अनंत नेता जाधव, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर, श्रीकांत घाडगे, शिवदास चटके, चंद्रकांत पवार, शिवसेना विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख लहू गायकवाड,राजन जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.