सोलापूर : थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त भैय्या चौक येथील डॉ.कोटणीस यांच्या पुतळ्यास आणि मनपा कौन्सिल हॉल येथील येथे डॉ.कोटणीस यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, प्रा.गणेश चन्न, प्रशांत मोहरकर, दीपक गायकवाड, जयप्रकाश अमनगी, सुरेश लिंगराज आदी मान्यवर उपस्थित होते.