• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2026
in इतर घडामोडी
0
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
0
SHARES
7
VIEWS

३० जून रोजी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांतर सोहळा

करमाळा- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा या संस्थेचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर’ असे नामकरण करण्यात येत असून, त्यानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नामांतर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या नामांतरामुळे राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य आणि युवक घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ संघ प्रचारक मदनदास देवी यांच्या कार्याचा गौरव होणार असून, भावी पिढीला त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

कार्यक्रमाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सर्व संबंधितांनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मदनदास गोवर्धनदास देवी यांचा जन्म करमाळा, जिल्हा सोलापूर येथे झाला. करमाळा आणि पुणे येथे एलएलबी आणि सीए पदवी प्राप्त केल्यानंतर सुमारे ६० वर्षांच्या काळातील आपले जीवन त्यांनी सामाजिक कार्यासाठी संपूर्णपणे समर्पित केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी-युवा संघटनेचे राष्ट्रीय संघटन मंत्री या नात्याने सत्तावीस वर्षे त्यांनी देशभरातील विद्यार्थी वर्गाचे नेतृत्व केले.

आणिबाणी विरुद्ध संघर्ष, आसाम येथील परकीय घूसखोरी विरुद्ध दहा हजार विद्यार्थ्यांचा सत्याग्रह, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्ध हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा मार्च यासारख्या राष्ट्रीय आंदोलनांमध्ये देशातील तरुण विद्यार्थी वर्गाचे त्यांनी समर्थ नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात काही काळ कारावासही भोगला. १९९२ पासून अखेर पर्यंत तीस वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह पदाचे दायित्व सांभाळत असतानाच समाजातील विविध संघटनांचे जसे कि, भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, दीनदयाळ शोध संस्थान, विदेशातील सामाजिक काम अशा विविध कामांचा समन्वय आणि मार्गदर्शनाचे काम त्यांनी कौशल्याने केले. वयाच्या ८१ व्या वर्षी बंगळुरू येथे त्यांचे देहावसान झाले. समाजातील हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रीय कार्याची प्रेरणा श्रीमान मदनदास देवी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

Previous Post

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026