• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
April 25, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरात गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण

????????????????????????????????????

0
SHARES
1
VIEWS

रस्ते विकासाबरोबर पाण्याचे स्त्रोत निर्माण होणार- नितीन गडकरी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली तर कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या विकासाबरोबर रस्त्याच्या कडेला पाण्याचे स्त्रोत देखील येत्या काळात निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर- विजयपूर, सोलापूर-सांगली आणि सोलापूर-अक्कलकोट असे तीन राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे बटण दाबून करण्यात आले. 8 हजार 17 कोटी रुपयांतून 250 किमी लांबीचे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. तर 164 कोटी रुपयांच्या कामातून 42 किमी लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते-पाटील, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 30 हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अद्यापही काही कामे सुरू होत आहेत. त्यामुळे निश्चीतच सोलापुरात पुढील काही वर्षात 60 हजार कोटी रुपयांची कामे होतील. राज्यातील इतका मोठ्या प्रमाणावर निधीतून सोलापूर जिल्ह्यात कामे होणारा बहुधा हा पहिलाच जिल्हा आहे. सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी मनपा, पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाचे काम सुरू करावे, तात्पुरता निधी केंद्राकडून उभा करू.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्ग सहा पदरी करणार असल्याचे त्यांनी मान्य केले. सुरत-चेन्नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर म्हणून ज्या भागातून जाणार तिथे उद्योग येतील, भागाचा विकास होईल, इंधनात, पैशाची बचत होणार आहे. शिवाय या भागात औद्योगिक आणि लॉजिस्टीक पार्कच्या योजना तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग तयार करताना रस्त्याच्या कडेला उत्खनन करुन पाण्याचे स्त्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. हेच पाणी शेतीला ठिबक सिंचनाद्वारे गेले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढेल. रस्ते विकासाबरोबर शेतकरीदेखील सुखी होईल, असा विश्वासही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.

बायो इथेनॉल तयार करा
जिल्ह्यातील साखर उत्पादकांनी आता साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न केले पाहिजेत. इथेनॉल निर्मितीतून वाहनांची वाहतूक सुरू केली पाहिजे. अन्यथा भविष्यात साखर उद्योग चिंताग्रस्त होईल. बायो इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन चालते. यावर चालणाऱ्या गाड्या भारतात येणार असून आता पेट्रोलची गरज भासणार नाही. येणारा काळ ग्रीन हायड्रोजनचा असून को-जनरेशन याचे करा. दुषित पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार होत असल्याने कारखाने टिकतील.

सोलापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उजनी-सोलापूर पाईपलाईन-पालकमंत्री भरणे
सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. समांतर पाईपलाईनच्या सोबत आणखी एक पाईनलाईन उजनी-सोलापूर टाकण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याने सोलापूरचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. देशात रस्त्याचे जाळे निर्माण करणारे आणि पूर्ण क्षमतेने काम करणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. नितीन गडकरी आणि शरद पवार हे नेते प्रत्येक समाजाला न्याय देणारे, माणसे जोडणारे, प्रत्येकाला मदत करणारे अशा व्यक्ती आहेत. सोलापूर जिल्ह्यात रस्त्याचे जाळे 325 किमीवरून 1350 किमीचे काम झाले आहे. बाह्य वळणाचे 187 किमीचे कामे सुरू आहेत. बोरामणी विमानतळासाठी वन विभागाची अडचण दूर केल्यानंतर चांगल्या प्रकारचे विमानतळ होईल, असा विश्वास श्री. भरणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे सरव्यवस्थापक अंशुमनी श्रीवास्तव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरिष बैंजल, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. महास्वामी, खासदार श्री.नाईक-निंबाळकर, विजापूरचे खासदार रमेश जिगाजिनगी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांनी विविध मागण्या मांडल्या.

नितीन गडकरी म्हणाले….
नागरिकांच्या आश्वासनाची पूर्तता करणार
लॉजिस्टीक पार्क बांधून राज्य सरकारला पार्टनरशिप देणार.
सोलापुरातील उड्डाणपुलाला मदत करणार.
सोलापूर-विजापूर सहा पदरी करणार
सोलापूर-पुणे सहा पदरी करणार.
बायो इथेनॉलवर भर देणार.
जलसंवर्धनामुळे सांगली-सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटला.
दिल्लीतून सर्व शहरे महामार्गाने जोडली.
सुरत-चेन्नई महामार्ग भागात औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कच्या योजना तयार करा.

Previous Post

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? सद्यस्थितीत लागू होऊ शकते का?

Next Post

राज ठाकरेच्या सभेच्या परवानगीबाबत सरकार निर्णय घेणार नाही : गृहमंत्री वळसे-पाटील

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
राज ठाकरेच्या सभेच्या परवानगीबाबत सरकार निर्णय घेणार नाही : गृहमंत्री वळसे-पाटील

राज ठाकरेच्या सभेच्या परवानगीबाबत सरकार निर्णय घेणार नाही : गृहमंत्री वळसे-पाटील

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026