• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहरातील उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2025
in इतर घडामोडी
0
शहरातील उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर
0
SHARES
2
VIEWS

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : सोलापूर शहरातील उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

२०१५ साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत. उड्डाणपूल मंजुर होऊन ९ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता. नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती. तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपूलाबाबत लक्षवेधीही मांडली होती. ९०% भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते कधी सुरू होणार ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरिता शासनस्तरावरून प्रयत्न होतील, असे सांगितले होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाणपूलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपये दिले आहेत. आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे.

मे अखेर निघणार निविदा

उड्डाणपुलासाठी उर्वरित भूसंपादन पूर्ण करुन मेअखेर सुधारित उड्डाणपूलासाठीची निविदा निघणार आहे, असे दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेला कळवले आहे.

६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प

सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपूलाला ६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असणार आहेत. तसेच दोन सर्व्हिस रस्तेही असणार आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासह सोलापूरकरांना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असे म्हणत विकासाचे अभिवचन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळत उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार मानावे तितके कमी आहेत. याकामी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद

Next Post

चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

ताज्या बातम्या

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

November 21, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026