• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2026
in इतर घडामोडी
0
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. ६ (जिमाका): स्त्रीभ्रूण हत्या रोखणे आणि मुलींच्या जन्माचा सन्मान राखणे ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. समाजात व्यापक जनजागृती झाल्यासच लिंगभेदमुक्त, संवेदनशील आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४’ अर्थात PCPNDT Act या विषयावर विधी स्वयंसेवकांसाठी आयोजित जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ॲड. पल्लवी कुलकर्णी यांनी PCPNDT कायद्याची उद्दिष्टे, गर्भलिंग निदानावरील कायदेशीर बंदी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि स्त्रीभ्रूण हत्येचे सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना विधी स्वयंसेवकांच्या भूमिकेवर भर दिला. ग्रामीण व शहरी भागात PCPNDT कायद्याबत व्यापक जनजागृती करून नागरिकांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी विधी स्वयंसेवकांनी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विधी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

Next Post

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026