लातूर-पुणे एसटी बसचा भीषण अपघात, ३० जण जखमी

0
41

लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या या अपघातात एसटीतील ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी १४ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जखमींची संख्या मोठी आहे.

लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून निघाली. आज सकाळी ही बस पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून एसटी बस खाली उतरली. ही . बस जोरात आदळल्यामुळे आतमधील प्रवाशी जोरात आदळले गेले. याशिवाय, एसटी बसची पुढील काच पूर्णपणे फुटली आहे. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. एसटीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशी आतमधून बाहेर आले. अनेकांना दुखापत झाल्याने काही प्रवाशी शेजारीच पडून होते. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.