• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2026
in Blog
0
100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण
0
SHARES
1
VIEWS

5 वे नांदी साहित्य संमेलनाचे थाटात उद्धाटन


सोलापूर- पुणे येथे जानेवारी 2027 मध्ये होवू घातलेल्या 100 व्या साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात 99 नांदी संमेलन करण्याची संकल्पना होती ती सत्यात उतरत आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये 5 वे नांदी संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उद्घाटक सिने अभिनेते योगेश सोमण यांनी केले. 5 व्या नांदी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रविंद्र गुर्जर, वामसी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक मदना केशव रेड्डी, जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, श्रृतीश्री वडगबाळकर, कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूरच्या माती मध्ये भाषा अनुबंधाची वेगळी ओळख आहे. आणि सोलापूरकरांनी मराठीसह इतर भाषेच्या साहित्याला भरभरून दिले आहे. मी नवखा असताना साहित्य परिषदेचा अध्यक्ष होण्यामध्ये सोलापूरकरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच 100 वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेत असताना सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होवून हे संमेलन यशस्वी करावे असेही योगेश सोमण यांनी सांगितले.

कवि संजीव व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणि वामसी लॅब यांच्या संयुक्तविद्यमाने सोलापूरच्या लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये 5 वे नांदी संमेलन घेण्यात आले. प्रारंभी सकाळच्या सत्रात नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या फिरत्या पुस्तकालय या बसचे उदघाटन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या संमेलनाचे समन्वयक जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी नांदी संमेलनाच्या आयोजनामागील हेतु स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र गुर्जर यांनी सांगितले की अनुवादातून अनेक विचार स्पष्ट करता येतात तसेच सध्याच्या एआयच्या युगात एआय हे मानवानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे एआयचे आव्हान आहे पण धोका नाही असे ते म्हणाले. माणसे जोडण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी भाषेचा योग्य वापर होतो. देहबोली, मातृभाषा, राज्य भाषा आणि राष्ट्रभाषा यासाठी घरातून योग्य संस्कार होणे गरजेचे आहेत असे आपल्या मनोगतामधून वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी यांनी सांगितले.

उदघाटनानंतर बहुभाषिक तसेच युवा कवी संमेलन पार पडले. यामध्ये हिंदीमधून डॉ. ममता बोल्ली, उर्दु मधून मीर अफजल,तेलगू मधून रेणुका बुधारम,कन्नड मधून दत्तात्रय इंगळे तर मराठी मधून राजेंद्र भोसले, मारूती कटकधोंड, कालीदास चवडेकर, सागर आचलकर, योजनगंधा जोशी, रेणुका महागांवकर, मुबारक शेख, शैल शिल्पा जाधव, डॉ. स्मिता पाटील मोहोळ,राम प्रभु माने, मदन जवळगेकर,सिकंदर मुजावर, बदीउज्मा बिराजदार, गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी आपल्या कविता सादर केल्या. दुपारी 12 वाजता युवा कवी संमेलन झाले त्यामध्ये प्रथमेश कासार, सिध्दाराम बन्ने, जयमाला गायकवाड, गायश्री हुलगप्पा मेट्रे, जैद शेख, तेजस्वीनी केंद्रे, यश क्षिरसागर, साक्षी सुराणा, संस्कृती कांबळे, रसिका येळवटकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शेरो- शायरी आणि कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुपारी 3 वाजता ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांचा कार्यक्रम सूर काही राहिले हा बहारदार कार्यक्रम झाला. विविध भाव गीत, भक्तीगीत आणि चित्रपटातील गीत कलावंतानी सादर केले त्याला संगितप्रेमी रसिकांनी मोठी दाद दिली. या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूरमधील, सोलापूर, जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पश्‍चिम सोलापूर, मोहोळ या शाखांच्यावर असूनप्रा.डॉ.श्रृतीश्री वडगबाळकर,किशोर चंडक, प्रा.नरेंद्र काटीकर,पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी, गिरीश दुनाखे,रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, शिवजी शिंदे, उज्वला साळुंखे, संतोष साळुंखे, श्रीकांत मोरे, अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ.स्मिता प्रमोद पाटील, सुधीर नाईकनवरे, जयेश आराध्ये हे सर्व पदाधिकारी आहेत तर संयोन समिती मध्ये गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, डॉ. नितीन आवताडे, वंदना कुलकर्णी, शोभा बोल्ली, अश्‍विनी चव्हाण, अविनाश कामतकर, भिमगोंडा पाटील, बदीउज्जमा बिराजदार, दत्तात्रय पाटील, प्रमोद कोरे, अनिल देवसाले, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर हे काम पाहणार आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका शोभा बोल्ली यांनी केले.


समेल्लनस्थळी मोबाईल व्यसनातून वाचनाकडे या शिर्षकाखालील विविध चित्र असलेले पोस्टरचे प्रदर्शन करण्यात आले होते. नांदी संमेलनाचे समन्वयक यशवंत बिराजदार यांच्या संकल्पनेतून हे चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.

Previous Post

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Related Posts

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Blog

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026
रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
Next Post
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026
100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026