पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत सखोल चर्चा : आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या सुरू असलेल्या निवडणुकीबाबत याप्रसंगी सविस्तर चर्चा करण्यात आली.
पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना साथ द्यावी असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
याप्रसंगी माया गांधी, पृथ्वीराज गांधी, अभिषेक गांधी, पराग शहा, भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपाच्या सरचिटणीस सुधा अल्लीमोरे आदी उपस्थित होते.













